![]() |
उसामा शाह
- सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन
बोरगाव मंजू :- नजीकच्या अन्वी मिर्झापुर येथे माता रमाबाई व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जयंती साजरी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे तर महाराष्ट्रचे सप्त खजरी वादक सत्यपाल महाराज यांचा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम शणीवारी सायंकाळी 7 वाजता भव्य दिव्य आयोजित करण्यात आले आहे प्रंसगी विशेष उपस्थिती भारीप बहुजन महासंघाचे नेते अॅण्ड बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार असून माजी मंत्री डाॅ. डि. एम. भांडे, आमदार बळीराम सिरस्कार , महसूल उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जि प. अध्यक्षा संध्याताई वाधोडे , तहसीलदार राजेश्वर हांडे, माजी आमदार हरिभाऊ भदे, आदी उपस्थित राहणार आहेत तरी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राजकुमार बागडे यानी केले आहे ,
