![]() |
मुर्तिजापूर प्रतिनीधी :- स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक यांचा प्रत्येक तहसिल कार्यालयावर आज दि. 01 फेब्रुवारी रोजी राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यासंदर्भात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने मुर्तिजापूर तहसिल कार्यालयावर तालुकाध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतुत्वात मोर्चा काढण्यात आला.रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक यांनी रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवानाधारक यांना मानधन देण्यात यावे. तसेच पॅाश मशीनद्वारे धान्य वाटप मशिन दुरूस्ती होई पर्यंत लागू करू नये, वाधवा कमेटीचा अहवाल लागू करावा. आणि 2017 मध्ये दुकानदारांना तांदूळ मिळाला नाही. त्याची व्यवस्था करावी या व इतर मागण्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला. या मागण्यांनबाबतचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व दुकांनदार तसेच करोसीन परवाना धारक सहभागी झाले होते.
