धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी


इकबाल मुल्ला 
लोहारा/प्रतिनिधी :-धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन लोहारा तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे कि,दोंडाईच्या येथील घडलेल्या तेली समाजाच्या बालीकेवर झालेल्या अत्याचाराची घटना दाबण्यासाठी संबंधित स्थानिक शालेय संस्था ज्ञानोपासक शिक्षण संस्था मंडळ संचालित संस्था नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या संस्थाचालकांनी व राजकीय लोकांनी निर्माण केलेल्या दबावाचा तीव्र निषेध करीत आहोत. पिडीत बालीकेच्या आई वडीलांना धमकवनाऱ्या व आमिष दाखवणाऱ्या संस्था चालकांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घृणास्पद असून माणुसकिला काळीमा फासणारी आहे.तरी बालिकेवर अत्याचार करणाऱ्या व त्यास पाठिशी घालणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.व तसेच अत्याचार प्रकरणी बालिकेच्या कुटुंबावर दबाव कायम असून शिक्षण व संस्थाचालकाच्या समर्थकांकडून त्यांना सतत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला जात आहे.त्यामुळे हे कुटुंब दहशतीखाली आहे.त्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर जिल्हा सचिव अँड.विशाल साखरे,लोहारा तालुका  अध्यक्ष भिमाशंकर डोकडे,उपाध्यक्ष उमाशंकर कलशेट्टी,प्रमोद बंगले,मल्लिकार्जुन कलशेट्टी,सचिन ठेले,गोविंद बंगले,उमेश जवादे,नाना बंगले,मिलिंद बंगले,गणेश खबोले,सुवन डोकडे,यांच्यासह तेली समाज बांधवाच्या सह्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post