इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:- लोहारा शहरातील राजेंद्र कदम यांना दि.20 फेब्रुवारी रोजी नळदुर्ग येथे सन 2018 चा राज्यस्तरीय संत रविदास ज्ञानकिरण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्यांनी केलेल्या समाज कार्याबद्दल अणदूर येथील ज्ञानकिरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सदरील पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय उपायुक्त कानडे,ज्ञानकिरण संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे,संस्थेचे सचिव चंद्रकांत कांबळे,अदि मान्यवर उपस्थित होते.या यशाबद्दल राजेंद्र कदम यांचे लोहारा तहसीलदार शोभा पुजारी,नायब तहसीलदार रणजित शिरालकर,प्रा.डॉ.मनोज सोमवंशी,रामहारी लहाडे,पुरवठा विभागाचे क्षीरसागर, माळी,जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे लोहारा तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,पत्रकार बालाजी बिराजार, पत्रकार गिरीश भगत,वंदना कदम-धुमाळ,प्रसाद पोते अधीक्षक नगर पंचायत लोहारा,अदिंनी अभिनंदन केले आहे.
