शेतकरी दक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज - शिवव्याखाते सचिन थाटे यांचे प्रतिपादन
प्रवीन वैष्णव
तेल्हारा प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांच हित जोपासणारे राजे होते म्हणून त्यांना शेतकरी दक्ष राजा असे म्हटल्या गेले असे प्रतिपादन तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वक्ते सचिन थाटे यांनी केले तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते .सर्व प्रथम गावातून मोठ्या उत्सवात मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली .मोठ्या जल्लोषामध्ये छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते .
शिव जयंती निमित्त गावामध्ये शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्र व शिवाजी महाराजांचे कर्तुत्व या विषयावर सचिन थाटे याचे व्याख्यान आयोजित केले होते .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकतांना ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या रयतेच, बहुजानाचे ,शेतकर्याचे , लोककल्याणकारी राज्य निर्माण केले असे प्रतिपादन त्यांनी केले .या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पांडुरंग पाथ्रीकर ,गोपाल राऊत ,महादेवराव चादुरकर ,शेषराव पाथ्रीकर ,पांडुरंग चिमणकर ,संजय पाथ्रीकर ,अरुण पाथ्रीकर,गणेश पाथ्रीकर ,जानराव पाथ्रीकर, पुरुषोत्तम पाथ्रीकर, सुधीर पाथ्रीकर ,यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे आयोजन विशाल भाऊ पाथ्रीकर व त्याचे मित्र परिवार समस्त मनब्दा गाव वासी याच्या वतीने करण्यात आली होती .या कार्यक्रमासाठी सुधीर पाथ्रीकर, रोषण पाथ्रीकर, अमोल पाथ्रीकर, सागर पाथ्रीकर, मंगेश चिमणकर ,विकी खेडकर ,प्रवीण पाथ्रीकर, मना गिरी ,सागर शेगोकार ,वैभव पाथ्रीकर,कुलदीप पाथ्रीकर, परमेश्वर पाथ्रीकर,शाम पाथ्रीकर, शिवा पाथ्रीकर,प्रदीप लोखंडे बजरंग पाथ्रीकर, संदीप पाथ्रीकर, प्रशांत साबळे भूषण पाथ्रीकर, पप्पू पाथ्रीकर, माणिक पाथ्रीकर,विठल पाथ्रीकर, प्रशांत पाथ्रीकर, मंगेश शेगोकार, सोपान पाथ्रीकर, विशाल शेगोकार ,सागर पाथ्रीकर, यांच्या सह शेकडो शिवभक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते.
