गारपीटग्रस्त भागातील वंचित शेतकऱ्यांना मदत मिळण्या करिता युवा क्रांती विकास मंचने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रवीण वैष्णव

  • तालुक्यात एकच पात्र लाभार्थी कसा काय ?.युवा क्रांती करणार आंदोलन

तेल्हारा दि. तेल्हारा तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाचा सर्वे चुकीचा झाला असून तालुक्यात एकच पात्र लाभार्थी कसा काय असा प्रश्न निर्माण झाल्याने  वंचित गारपीटग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळावी याकरिता युवा क्रांती विकास मंच चे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांच्या मार्फत पालकमंत्री ना.डॉ.रणजित पाटील व जिल्हाधिकारी  अकोला यांना 21 फेब्रुवारीला निवेदन देऊन मांगणी करण्यात आली  दि.११ फेब्रुवारी रोजी तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडका बसला गारपिटीने तालुक्यातील दानापूर,सौडला,खंडाला,चितलवाडी आदि भागांमध्ये हरभरा गहू या रब्बी पिकासह संत्रा लिंबू केळी आंबा हे फळ पिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुसकान झाले.कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिंकाचे नुसकान झाल्याने शेतकरी बांधवांच्या हात तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला.दरम्यान जिल्याचे पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील  यांनी प्रशासकीय यंत्रणा सोबत घेऊन गारपीट ग्रस्त भागाचा दौरा करून नुसकान ग्रस्त शेतकरी बांधवाना मदत देण्याचे आश्वासन दिले.ज्या प्रशासकीय यंत्रणे कडून सर्वे करण्यात आला. त्यांनी शेतकर्यांच्या पिंकांचे प्रचंड प्रमाणात नुसकान झाल्या नंतर हि सुद्धा तालुक्यातून केवळ एकच शेतकरी मदती साठी पात्र ठरविला त्यामुळे हा सर्वे म्हणजे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे.यामध्ये हवालदिल झालेल्या शेतकर्यांच्या मदती बाबत राजकारण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.सबधित अधिकार्यांनी कुण्याच्या दवाबाखाली तर सर्वे केला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील  व जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन तालुक्यातील नुसकान ग्रस्त भागातील वंचित शेतकरी बांधवाना लाभ मिळून द्यावा अन्यथा युवक्रांती विकास मंच ला शेतकरी बांधवांच्या हितार्थ आदोलन करावे लागेल असे निवेदन युवा क्रांती विकास मंचच्या वतीने देण्यात आले या वेळी युव क्रांती विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर तालुका अध्यक्ष अनंत माणखैर संतोष राठी विठ्ठल राऊत राजेश काटे संदीप खारोडे अजय गावंडे अशोक बोर्डे स्वप्नील सुरे प्रकाश मोहोड  गोपाल जलमकार  रवी इंगळे आकाश फाटकर अमर ठाकूर   शेवक राम हेरोडे पवन झापर्डे शिवम घोडेस्वार अभिजित लासुरकार बजरंग गाडगे कैलास भोजने  बबलू ठाकूर सीताराम पवार सचिन चौधरी ऋषीकेस शिंगणे निखिल काळे अमित घोडेस्वार शुभम बरडे  राहुल भिवटे दीपक उंबरकार स्वप्नील तायडे निखिल कोल्हे  श्याम ओळबे इत्यादी युवा क्रांती विकास मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post