बोंड अळी ग्रस्त कापूस उत्पादकांना जाहीर केलेली मदत मार्च२०१८अखेर मिळावी



  • धरणे धरा कार्यक्रमाचे आयोजन   

मूर्तीजापुर :- बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी याना जाहीर केलेली मदत मार्च २०१८ अखेर मिळावी, हायकोर्टाने आदेश दिलेले २०१५- २०१६ चे ६८०० रूपये दुष्काळी मदत त्वरित धावी या करीता दि. २८ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत तहसील कार्यालया समोर धरणे धरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. धरणे धरा कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकनायक,शेती प्रश्ननाचे गाढे अभ्यासक शेतकरी नेते प्रकाश पोहरे याची उपस्थिती राहणार आहे. जनमंच नागपूर, प्रगती शेतकरी मंडळ जांभा खु।।,शेतकरी कामगार पक्ष , स्वाभिमानी संघटना, भारतीय किसान संघ, न्यु. यंग क्लब मूर्तीजापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित धरणे धरा कार्यक्रमात बोंड अळीची हेक्टरी ३७,५०० रूपये जाहीर केलेली मदत कोर्ट कचेरीत अडकवणार की दि.९ मार्च रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पात ती देण्याची आर्थिक तरतूद करणार ????अश्या विविध मागणी साठी एकदिवशीय धरणे धरा आदोलन कार्यक्रमाचे आयोजन दि.२८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मूर्तीजापुर तालुक्यातील शेतकरी शेतमजूर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान राजु वानखडे अध्यक्ष प्रगती शेतकरी मंडळ जांभाखु।।, प्रा.सुधाकर गौरखेडे जनमंच नागपूर, गोपाल तायडे, नरेंद्र तिडके, राहुल राठी, माधव काळे, देविदास बांगड, मुन्ना नाईकनवरे, शरद बंग, नितीन गावंडे, सुधाकर बानाईत, पंकज कांबे, अरूण बोंडे आदींनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post