- संक रॉक ते गेट वे ऑफ इंडीया चे अंतर केले पार
प्रतिनिधी यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना मुंबई तर्फे आयोजित 56 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत यवतमाळच्या पाच स्पर्धकांनी यश संपादन केले. या स्पर्धकांनी दोन तसेच पाच किलोमिटर अंतर यशस्वी पणे पार केले.यवतमाळचे नंदुरकर हौशी जलतरण संघटनेचे उदय कोल्हे, आयुष भागवते, शैलेष देशमुख, नारायण तांबुळे यांनी पाच किलोमिटर तसेच संकल्प गवळी या विद्यार्थ्याने दोन किलोमिटर अंतर यशस्वीपणे पार केले. या स्पर्धेसाठी राज्यातील 28 जिल्हयातील स्पर्धक सहभागी झाले होते. मुंबई येथे सर्व स्पर्धकांना प्रथम एका बोटीने समुद्रात संक रॉक या लाईट हाऊस पर्यन्त नेण्यात आले. त्यानंतर त्यांना समुद्रात उडी मारुन गेट वे ऑफ इंडीया पर्यन्त पोहत यावे लागले. यवतमाळच्या या पाचही स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत जवळपास पाचशे पेक्षाही जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. याआधीही यवतमाळच्या स्पर्धकांनी मालवन येथे तीन किलोमिटर ची सागरी जलतरण स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण केली होती. यशस्वी स्पर्धकांचे यवतमाळकरांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.
