बारावीचा पेपर फुटला, तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर


सुनिल कोडगी

  • सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळून आली._

सोलापूर/प्रतिनिधी २१- बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर जेमतेम तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळून आली.
मात्र प्रश्नपत्रिका कुठून लीक झाली याची अद्याप माहिती नाही.
तांबेवाडीच्या आश्रमशाळेत काही जणांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळून आली. पण पेपर फुटला असला तरी ही प्रश्नपत्रिका परीक्षा हॉलमधून बाहेर कशी आली, याचा खुलासा झालेला नाही.सेक्शन ए, बी आणि सी या प्रश्नपत्रिका लीक झाल्या आहेत. दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात 252 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण पहिल्याच दिवशी इंग्रजीची प्रश्नपत्रिका थेट सोशल मीडियावर आली आहे. इंग्रजीचा पेपर सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे नातेवाईक कॉपी टाकताना दिसून आलं. शाळेच्या जवळच काही दुकानं उभारण्यात आलेली आहेत. तिथे बसून गाईडमध्ये पाहून उत्तरं लिहिली जात आहेत. ही उत्तरं थेट विद्यार्थ्यांना पुरवली जात असल्याचं समोर आलं.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post
21 February 2018 at 21:50

सर्व बातम्या एक नंबर सर. आणि आपल्या मुळे आम्हाला सर्व बातम्या पाहण्यासाठी मिळाळे

Reply
avatar