सोलापुर - एमआयडीसीत टॉवेल कारखान्याला आग


सोलापूर - प्रतिनिधी :-अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीत टॉवेल कारखान्याला आज भीषण आग लागली. आग लागल्यावर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. उद्योजक राठी यांचा हा टॉवेल कारखाना असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. .आगीत  या आगीत कारखान्याचे एक कोटीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने आगीत जीवित हानी झालेली नाही.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post