शिक्षण व फळशेतीत उल्लेखनीय


इकबाल मुल्ला
लोहारा :- शिक्षण व फळशेतीत उल्लेखनीय काम केल्यानंतर हराळी (ता लोहारा) येथील ज्ञान प्रबोधिनी केंद्राने लोहारा परिसरात जलसमृधीसाठी पुढाकार घेतला आहे.गेल्या दोन वर्षीत हराळी,तोरंबा, काटेचिंचोली या गावच्या शिवारात लोकसहभागातून विविध जलसंधारणाचे कामे करीत वाहून जाणारे जवळपास पाच कोटी लिटर पाणी आडवून मूरविण्यात यशस्वी झाले आहेत.यातून या गावात भूगर्भातील पाणी पातळी वाढी बरोबरच या भागातील विविध क्षेत्रात काम करणारया सामाजिक संस्थेपुढे ज्ञान प्रबोधिनी केंद्राने एका आदर्श निर्माण केले आहे. देवबेट टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या हराळी या खेड्यात १९९३ च्या भूकंपानंतर ज्ञान प्रबोधिनी या संस्थेने शाळा सुरु केली. अल्पकाळातच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून या संस्थेने माळरानावर विद्यालयाची भव्य वास्तू उभी केली आहे शैक्षणिक उपक्रमासह या संस्थेकडून विविध उपक्रम नेहमी चालू असतात. त्यात कृषी विद्यालयसह फळबागा शेती, फल प्रक्रिया उद्दोग, बिजोउत्पादन, कृषी पर्यटन, सौर प्रकल्प आदी उपक्रमे यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. आता प्रबोधिनी केंद्राने तालुक्यातील विविध ग्रामीण प्रश्नावर काम करण्यासाठी 'ग्रामविकसन' विभाग कार्यान्वीत केले आहे. गेल्या चार- पाच वर्षात तालुक्यात भीषण दुष्काळाची झळा बसत आहेत.सर्व क्षेत्रात तीव्र पाणी टंचाईमुळे हाणी झाली आहे. शेतकरयाचे तर मोठी नुकसान झाले आहे. या पुढेच्या काळात पाणी हे सर्व प्रश्नांचे मुळ राहणार आहे. सर्वकंश शाश्वत विकासासाठी जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे.तसेच  ग्रामीण जीवनातील आर्थकारण संपूर्णता पाण्यावच अवलंबून आहे. म्हणून या परिसरात ज्ञान प्रबोधिनी केंद्राने गेल्या दोन वर्षापासून जलसमृधीसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. लोहारा तालुक्यातील देवबेट टेकडीच्या दश्चिण भागातून बन्नीतूरा नदी उगम पावते तर पूर्व भागातून तावशी नदी उगम पावते तावशी ही नदी पुढे जाऊन तेरणा नंदीला मिळते. सुरवातीला ज्ञान प्रबोधिनी केंद्राने या तावशी नदीच्या पानलोट क्षेत्रात जलसंधारणाचे कामे हाती घेण्याचा संकल्प केला आहे.
यासाठी ज्ञान प्रबोधिनी केंद्राचे प्रमुख अभिजीत कापरे यांच्या मर्गदर्शनाखाली ग्रामविकसन विभागाचे प्रमुख व जलदुत सचिन सूर्यवंशी व कल्याण औटे यांच्यावर ही जबाबदारी सोपिण्यात आली आहे. या नदीच्या पानलोट क्षेत्रात हराळी, तोरंबा, सालेगाव, तावशी, काटेचिंचोली, उदतपूर व तावशी या गावच्या शिवाराचा समावेश होतो. पहिल्या टप्प्यात हराळी, तोरंबा, काटेचिंचोली या गावच्या शिवारात जलसंधारणाचे कामे चालू करण्यात आले आहे. सुरुवातीला या गावात दहा- दहा जणाची पाणलोट क्षेत्र विकास समिती गटीत करण्यात आले यातूनच दोन - दोन जलदूताची निवड करण्यात आले. त्यांना याबाबत हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात विविध ठिकाणी परिक्षेत्र भेटी बरोबरच प्रशिक्षण देण्यात आल्या. यातून या दोन वर्षात हराळी येथील सहा, तोरंबा येथील दोन तर काटेचिंचोली येथील एक असे एकून नऊ सिमेंट बांधारयातील गाळ काढण्यात आले आहे. तसेच हराळी येथील पाच किमी , तोरंबा येथील अडीच किमी तर तर काटेचिंचोली येथील एक किमीच्या ओढयाचे सरासरी दीड फुट खोल व चार मीटर रुंद असे ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. यावेळी ५ हजार ४८० ट्रीप गाळ निघाला असून येथील शेतकरयांनी निघालेला हा गाळ स्वखर्चानी ट्रॅक्टरने आपल्या शेतात टाकला आहे. यासाठी एकूण १४ लाख २१ हजार १२० रुपये खर्च झाला आहे. यात प्रबोधिनी केंदाने १० लाख ८४ हजार ९७० रुपये खर्च केले असून उर्वरीत ३ लाख ३६ हजार १५० रुपये लोकवाटा जम झाला आहे. यामध्ये प्रत्यक गावातुन लोकसहभाग हा प्रामुख्याने होता. या कामामुळे एकूण ५ कोटी २० लाख १ हजार ७२९ लिटर पाण्याची साठवण होत आहे  या कामाची दखल म्हणून अँटलास काँपको चँरीटेबल फाउडेशन व सेवावर्धिनी पुणे यांच्या संयुक्त विद्धमाने जलदुत अशा दूरदृष्टि व महत्वकांक्षी प्रकल्पामध्ये ज्ञान प्रबोधिनी केंदाचि निवड करण्यात येऊन 3 लाख ५० हजार रुपये बांध-बंधिस्तीसाठी देण्यात आली आहे. या रक्कमेतून हराळी शिवात ८३ हेक्टर शेती क्षेत्रात बांध-बंधिस्तीची कामे करण्यात आले आहे. यातून हराळी, तोरंबा या गावात भूगर्भातील पाणी पातळी वाढी बरोबरच या भागातील विविध क्षेत्रात काम करणारया सामाजिक संस्थेपुढे ज्ञान प्रबोधिनी केंद्राने एका आदर्श निर्माण केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post