यवतमाळ मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता एका राजकीय पक्षाचे पि.आर.ओ - मोहम्मद आसिम अली


मक़सूद अली 
यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.श्रीगिरीवार यांची गैर कायदेशीर नेमणुक झाल्यापा सून त्यांचे कारकर्दीत गैरकायदेशिर व नियमबाह्य कामे करणे, विशिष्ट राजकीय पक्ष करीता काम करणे, जातीय भेदभाव निर्माण करणे, भ्रष्टाचार मध्ये वाढ होणे, मर्जीतील अधिकारी व कर्मचारींची सेवा जेष्ठता डावलून नेमणुक व बदली करणे, स्वताचा वाढदिवस साजरा करण्यास परिपत्रक काढणे, पदाचा गैरवापर करणे तसेच श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी न करणे म्हणून त्यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीचे एक निवेदन राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद असीम अली यांचे नृत्वात जिल्हाधिकारींना देण्यात आले. या निवेदनाच्या  प्रती राज्यपाल, मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे प्रधान सचिव यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त तसेच विष बाधीत जिल्हा म्हणून घोषीत झाला आहे, जिल्हयात बरेच दिवसांपासून  प्रभारी अधिष्ठाता डॉ.श्रीगिरीवार यांची नियमबाह्य नेमणुक झाली, त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हापास मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. यांचे कार्यकाळात भ्रष्टाचारही वाढला असल्याचे म्हटले आहे, त्यांनी शासनाच्या परिपत्रकाला डावलून संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी केली  नाही, याबाबतची तक्रार बंजारा समाजाचे पुर्वीच जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. या सर्व बाबी गंभीर असल्याने तात्काळ डॉ.श्रीगिरीवार यांचेवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शेवटी मो.आसीम अली यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post