लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीचे भुमिपुजन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीचे भुमिपुजन जि.प.च्या समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायणकर यांच्या हस्ते करण्यात आले. बेंडकाळ गावालगत पाझर तलाव असुन या पाझर तलावाची प्रचंड दुरवस्था झाली असुन पावसाळ्यात एक थेंब  पाणी या तलावात थाबत नाही. त्यामुळे तलावाच्या खाली असलेल्या ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहीर उन्हाळ्यात पुर्ण पणे कोरडी पडत त्यामुळे येथील नागरीकांना भर उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते.पण गुरुवारी या पाझर तलाव दुरुस्तीचे भुमिपुजन जि.प.च्या समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायणकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परीषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ई.टी. सुर्यवंशी,स्थापित्य अभियंता अरुण सारंग,विष्णु नारायणकर,बाजार समितीचे संचालक अनंत गोरे, रामा स्वामी,आप्पा औसेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post