इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सनराईज इंग्लिश स्कूल उस्मानाबाद यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी संभाजी आनंद गोरे याने प्रथम क्रमांक,कार्तिकी प्रविण कदम कार्तिकी हिने द्वितीय क्रमांक तर अंकिताकुमारी राघव पाल हिने सहभाग नोंदवून शाळेचे नाव लौकिक केले आहे.त्यामुळे त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करुन अभिनंदन करण्यात आला.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. निर्मला ताई गोरे,संस्थापक नेताजी गोरे,प्राचार्या सौ.मधुमती गोरे,एस.व्ही.बिराजदार,जे.ए. ए.के.कमलापुरे,एम.व्ही.सुर्यवंशी,ए.एस.जगताप, व्ही.जे.बनकर,यांच्यासह सर्व शिक्षक,कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.
