इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवजयंती निमित्त व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून संभाजी ब्रिगेडचे किरण गायकवाड(जिल्हा अध्यक्ष,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद,उस्मानाबाद जिल्हा),आदेश शिंदे(वीर भगत सिंग विद्यार्थी परिषदेचे पुणे स्टेशन विभाग अध्यक्ष) उपस्थित होते.यावेळी किरण गायकवाड यांनी वाक्तृत्वातून वडगावच्या जनतेवर प्रभाव टाकत असताना शिवरायांवर गाढा अभ्यास करून नागरिकांना मंत्रमुग्ध करून सोडले,शिवरायांच्या काळातील महाराष्ट्र आणि आजच्या काळातील महाराष्ट्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले,त्यांनी अनेक मुद्द्यांना धरून अतिशय सुंदर असं व्याख्यान केले. त्यानंतर शिंदे यांनी शिवराय हे कोना एका जातीचे नसून अखंड विश्वाचे आराध्य दैवत आहेत,असे प्रतिपादन केले
.छत्रपतींचे नाव घेताच अंगातील रक्त सळसळते झाले पाहिजे,जाणुकाय शिवराय आपल्याच अंगात अवतरले कि काय असे वाटावे, शिवजयंती एक जागतिक सण म्हणून साजरा केला जावा असे सांगीतले.
यावेळी बार्टीचे समतादूत नागेश फुलसुंदर यांनी छत्रपतींचा भावी जीवनावर असलेला गाढा अभ्यास त्यात पाणी आडवा पाणी जिरवा संकल्पना,वृक्ष संगोपन,शौचालयाची संकल्पना,कुळवाडीभूषण, रयतेविषयी असलेले अतूट प्रेम, स्वराज्याची संकल्पना,शिवरायावरील जागतिक संशोधन अश्या अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास वडगावचे उपसरपंच लक्ष्मण भुजबळ,पोलीस पाटील मारुती लोहार,ग्रा.पं. सदस्य विलास फुलसुंदर,बार्टीचे समादुत नागेश फुलसुंदर, पोपट पवार,यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचीन पवार यांनी केले तर आभार शरद पवार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पवार,अप्पाराव चव्हाण,संदीप पवार,तुकाराम साळुंके,शाम पवार,आयज सय्यद, ऋषिकेश बिराजदार,अदिंनी परिश्रम घेतले.

