26 फेब्रुवारी रोजी कायदेविषयक प्रबोधन शिबिराचे आयोजन

मक़सूद अली
यवतमाळ, दि. 22 : ज्येष्ठ नागरिक मंडळ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 फेब्रुवारी  रोजी सायंकाळी 5.30 वाजता ज्येष्ठ नागरिक भवन येथे “ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार” तसेच “तृतीयपंथांच्या समस्या व त्यावर उपायोजना” या विषयावर कायदेविषयक प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश सुरेश राजुरकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार तर प्रमुख अतिथी म्हणून सह दिवाणी न्यायाधीश एम.आर.ए. शेख उपस्थित राहतील. संबंधितांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post