आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची संधी

यवतमाळ, दि. 26 : आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर जि.अमरावती येथे नोकरीच्या विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य तयारी करून घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्याचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. तसेच विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संचसुध्दा विनामुल्य देण्यात येतो.
या प्रशिक्षणाकरीता इच्छुक उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच 1 एप्रिल 2018 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण केलेले असावे, तर 15 जुलै 2018 रोजी त्याने 30 वर्ष पूर्ण केलेले नसावे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी 20 मार्च 2018 पर्यंत आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपुर कॅम्प, परतवाडा, जि.अमरावती येथे अर्ज सादर करावे. अधिक माहितीकरीता 07223-221205 या क्रमांकावर संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post