सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण


  •  9 मार्च रोजी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 26 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी नाशिक येथील छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात 13 मार्च ते 22 मार्च या कालावधीत मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजन व प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे शुक्रवार दिनांक 9 मार्च 2018 रोजी मुलाखतीस हजर राहावे. तसेच सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या संकेत स्थळावर www.mahasainik.com वरील recruitment tab ला क्लिक करून त्या मधील उपलब्ध चेकलिस्ट आणि महत्वाच्या तारखा यांची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढावी. या संकेतस्थळावर दिलेले सर्व परिशिष्ठ डाऊनलोड करून त्याच्यासुध्दा प्रिंट भरुन आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरीता छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी 0253-2451031 व 2451032 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा माजी फ्लाईंट लेफ्ट. धनंजय सदाफळ यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post