सर सय्यद अहमद खान वरिष्ठ उर्दु प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न


प्रकाश श्रीवास 
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधि :-  माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा महाविद्यालयात शिक्षण क्षेत्रात नियमित  होणारे वार्षिक स्नेह सम्मेलन ही नित्याची बाब झाली आहे परंतु न .पा च्या अधिनस्थ स्नेह सम्मेलनाची मुहूतमेढ स्थानिक सर सैय्यद अहमद खान वरिष्ठ प्राथमिक शाळेने  रोवाली आहे.
जुन्या न. पा परीषद परिसरातील या शाळेने आपले पहिले-वहिले स्नेह संम्मेलन    नुकतेच पार पडले. या स्नेह संम्मेलनाला प्रमुख मान्यवरामध्ये न.पा  शिक्षण सभापती सुनील पवार प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे अब्दुल रशीद शमशुद्दीन नासिरोद्दीन छोटू मिया पो.पा. रामराव देशमुख आदी उपस्थित होते. स्नेह संमेलनाची सुरुवात पवित्र कुराणाचे पठण करून करण्यात आली. त्यानंतर या स्नेहसंमेलनात शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या अंगभूत गुणांना वाव देत विविध कला गुणांना प्रेक्षकांसमोर सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक नासीर हुसेन खान यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.   यावेळे मान्यवरांनी न.पा प्रथमिक शाळेतील या उपक्रमाचे कौतुक केले व अशा प्रकारचे स्नेहसंमेलन दरवर्षी प्रत्येक शाळेत या व्हावयास हवे असे प्रशासकीय अधिकारी प्रमुख टेकाडे यांनी म्हटले.कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक नासीर हुसेन खान शिक्षक मुरस्लीमोद्दीन फरहीन  फातेमा नाजिम अन्सारी, सिद्दीका सय्यद , शमशुन निसा यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला विद्यार्थी पालक व नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती .  कार्यक्रमाचे संचलन व आभार मुरस्लीमोद्दीन  यांनी केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post