तरुणाची गळफासाने आत्महत्या



साजिद पतलेवाले
 दिग्रस :- तालुक्यातील शिवापूर येथील एका २२ वर्षीय तरुणाने चिंचोली खुर्द शेतशिवारात बोरीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारला दुपारी १ च्या दरम्यान उघडकीस आली.मृतक चेतन सुभाष कुरसंगे (वय-२२) रा.शिवापूर याने चिंचोली खुर्द शिवारातील शामराव खंडारे यांचा शेतातील बोरीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने दुपारी १ वाजताच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.या प्रकरणी तक्रार नंदू मधुकर कुरसंगे याने पोलिसात दिली असून  माञ वृत्त लिहले पर्यंत मृत्यूचे कारण कळू शकले नाही.मृतकाच्या पश्चात आई,वडील,२ भाऊ ,१ बहीण असा आप्त परिवार आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post