![]() |
साजिद पतलेवाले
- माहेरील मंडळींचा घातपात केल्याचा संशय
दिग्रस :- दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील एका महिलेने घराच्या सपरित असलेल्या आड्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.१ फेब्रुवारीच्या सकाळी ४ च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेबाबत माहेरील मंडळींनी संशय व्यक्त केला आहे.सौ.लक्ष्मीबाई दादाराव नांदे (वय-२३) रा. सिंगद हिची गळफासाने आत्महत्या झाली.याबाबत मृतक महिलेच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशन ला येऊन आत्महत्या प्रकरणी संशय व्यक्त केला आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.मृतक महिलेच्या पश्चात पती,१ मुलगी,१ मुलगा असा आप्त परिवार आहे.या प्रकरणी आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश मोरे,प्रकाश चव्हाण,दत्ता पवार करीत आहे.
