अज्ञात वाहनाच्या धडकेत १ ठार तर १ गंभीर जखमी



साजिद पतलेवाले
 दिग्रस :- मानोरा मार्गे रामनगर जवळील उतार रस्त्यावर झालेल्या दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेत १ ठार तर १ गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.१ फेब्रुवारी २०१८ च्या सायंकाळी ५:३० वाजता दरम्यान घडली.दिग्रसवरून एम एच-२९ ए एफ ७३०९ (डिस्कवर)दुचाकीस्वार मानोरा मार्गे जात असतांना रामनगर जवळील उतार रस्त्यावर समोरील येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत दिनेश रामसिंग पवार (वय २९) रा.संभाजीनगर,दिग्रस हा ठार झाला तर शंकर पूनम चव्हाण (वय-२८) रा.संभाजीनगर ता.दिग्रस हा गंभीर जखमी झाला असून जखमींला प्रथमोपचार ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.जखमी शंकर चव्हाण याची प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post