मूर्तीजापुर लदेसा उपजिल्हा रूग्णालयातील कंत्राटी कामगाराचे उपोषण सुरू


प्रकाश श्रीवास 
मुर्तीजापुर ( तालुका प्रतिनिधी) येथील श्रीमती लक्षमीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रूगणालयातील कंत्राटी कामगारानी आपल्या थकीत असलेल्या वेतना साठी दि.२६ फेब्रुवारी पासून रूग्णालय परीसरात आमरण उपोषण सुरू केले आहे.त्यामुळे रूग्णालयातील अत्यंत महत्त्वाची असलेली संपूर्ण सुविधा ठप झाली आहे. मूर्तीजापुर येथील श्रीमती लक्षमीबाई देशमुख सामान्य रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने समर्थ सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या.व विदर्भ युवक स्वयं रोजगार सेवा सहकारी सोसायटी वर्धा याचेवतीने रूग्णालयातील गरीब रूग्णांणा जेवन आणि स्वच्छता करण्याचे कंत्राट वाहन चालकाची सुविधा पुरविण्यात येते. ही पुरविली जाणारी सुविधा समाधान कारक असल्याचे प्रमाणपत्र आपण आमच्या संस्थेला दिलेले आहे. वारंवार विनंती पुर्वक मागणी करून सुदधा दि.१ एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीतील संस्थेचे देयके अदा केले नाही. आणि संस्थची आहार सेवा समाधानकारक असल्यास आहार सेवेच्या देयकात वार्षिक १०/- टकके दर वाढ देण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना सुचविलेले आहे. आमदार हरीष पिंपळे यांनी १०% चे देयक अदायगी बाबत पत्र दिलेले आहे. एवढेंच नव्हे तर विजय देशमुख सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यांचे दालन नागपूर येथे संचालक, उपसंचालक,जिल्हा शल्य चिकित्सक, आ.पिंपळे आदीच्या उपस्थित १०% च्या देयका बाबत चर्चा झालेली आहे. मात्र तरीसुद्धा १०% चे आहार सेवेचे देयक जाणीव पुर्वक अदा करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आम्हाला आमरण उपोषणाला नाईलाजास्तव बसावे लागत आहे.पुर्णपणे देयक मिळेपर्यंत आमचे उपोषण सुरू राहणार आहे. आणि रुग्णाच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत याला प्रशासनहेच सर्वस्वी जवाबदार राहील. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या सुरु झालेल्या उपोषणामध्ये १० सफाई कामगार, स्वंयपाकी, २ डॉक्टर, संतोष कपीले आदींचा समावेश आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post