तेली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा निषेध


प्रकाश श्रीवास
 मूर्तीजापुर तालुका प्रतिनिधी:-  येथील संताजी सेना च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन देवुन धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात तेली समाजाचे अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि आरोपी विरूद्ध कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात तेली समाजाचे अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार झाल्याची एक घटना नुतन महाविद्यालयात घडली आहे. मानवतेला काळीमा फासणाया या घटनेचा मूर्तीजापुर येथील संताजी सेना तालुक्याचे वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने यांना एक निवेदन देवून करण्यात आली. निवेदनावर सुमीत किशोर सोनोने तालुका अध्यक्ष संताजी सेना, प्रशांत गडवाले, योगेश आगाशे, राहुल गूल्हाने, राजेंद्र कपीले, पंकज अंबाडेकर, आशीष बोबडे, लोकेश लोखंडे, अमीत सोनोने, निलेश सुखसोहळे,राहुल गूल्हाने, पुशपक हांडे, कुणाल पळसोकर, शुभम कनोजे, अजय चतुरकर, समाजसेवक ज्ञानेश्वर गडवाले, आदी च्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post