प्रकाश श्रीवास
मूर्तीजापुर तालुका प्रतिनिधी :- स्व. नंदाबाई किर्दक बहुउदेशीय संस्था ब्रम्हीबाई यांचे वतीने ग्राम पंचायत कार्यालय खापरवाडा येथे शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या १४ वित्त आयोग प्रशिक्षण कार्यक्रमा अंर्तगत गावामधील महिला/ युवती यांना स्वयमरोजगार कमविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शिवणकाम प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उदघाटन करून प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी खापरवाडा येथील सरपंचा सौ. शुभांगी ताई सरोदे, ग्रामपंचायत सचिव अवधूत, संस्था अध्यक्ष मिलिंद जामनीक, प्रशिक्षक श्रीमती श्यामसुंदर मँडम, नारायण सरोदे, सतीष, बाबुलाल गवई, व मोठ्या प्रमाणात महीला भगीनी उपस्थित होत्या.
