हिन्दु – मुस्लीम किवा कोणीही असो आपण एकच ईश्वराचे लेकरे आहोत – तहसिलदार श्री.राहुल तायडे



अतुल नवघरे

  • जगदगुरु  संतशिरोमणी रविदास महाराजाची  ६४१ वि जयंती उत्सव

लाखपुरी :- मुर्तिजापुर तालुक्यातील तिर्थ क्षेत्र व साडे अकारा ज्योतीलिंग असलेल्या विदर्भातील काशी म्हणुन ओळखल्याजाणा-या लाखपुरी येथील चर्मकार समाज यांच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज ६४१ वी जयंती ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी. ६ वाजता तिर्थ क्षेत्र लक्षेश्वर संस्थान येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला अध्यक्ष तहसिलदार श्री. राहुल तायडे , उद्गघाटक ठाणेदार श्री. नितीन पाटील , प्रमुख अतिथी महादेवराव नाचणे व मान्यवरांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांचा सत्कार ग्रामस्थानच्या वतीने करण्यात आला . संत रविदास महाराज हे संपुर्ण भारतात पुजनीय असुन त्यांना जाती भेद पसंद नव्हता. ते नेहमी जातीभेद मिठविण्यासाठी झगडत राहिले. वर्ण व्यवस्थेतील जातीप्रथा , उच-नीच , गरिब – श्रीमंत अश्या भेदभावपुर्ण परंपरेला त्यांनी विनम्रतेने विरोध केला गुरुग्रंथासाहीब मध्ये संत रविदासाचे अनेक दोहे आहेत. हिंन्दु – मुस्लिम किंवा कोणीही असो आपण एकच ईश्वराचे लेकरे आहोत. ते नेहमी म्हणत ‘मन चँगा तो कटोतिमे गंगा , अशा महान संताची प्रेरणा घेऊन  व शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेऊन समाजाने विकास साधावा , असे उद्गगार तहसिलदार श्री. राहुल तायडे यांनी काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री राहुल तायडे तहसीलदार  मुर्तिजापूर , उदघाटक श्री. नितीन पाटील ठाणेदार मुर्तिजापुर ग्रामिण , प्रमुख अतिथी श्री. महादेवराव  नाचणे , श्री.श्रीकांत मिसाळ नायब तहसिलदार मुर्तिजापुर ,श्री. राजुभाऊ नाचणे,श्री .राजूभाऊ दहापुते ,श्री.धनंजय मोकळे ,श्री.हरिनारायण व्यास ,श्री.डिंगाबर नाचणे कार्यक्रमा मध्ये श्री. महादेवराव नाचणे यांनी रविदास महाराजांच्या  सामाजिक कार्याविषयी  सखोल  माहिती दिली, तसेंच कार्यक्रमाचे समारोपीय मध्ये ,राष्ट्रीय कीर्तन  ह.भ.प.प्रकाश  मांगे महाराजांनी प्रबोधनपर किर्तन सादर केले.कार्यक्रमाचे संचालन  श्री. निलेश ढाकरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी साठी .श्री दत्ताभाऊ नाचणे,प्रमोद गाठेकर,विष्णुभाऊ ढाकरे,दत्ता गव्हाळे ,संदीप वानरे, गोपाळ इंगळे,किशोर गोरे  ,अनिल धामणे  ,पिंटू  गोरे,महेश ढाकरे , संदीप  गोरे, सचिन नाचणे,हरीश  गाटेकर ,राजूभाऊ नांदुरकर ,गोविंदा  मालखेडे व सर्व चर्मकार  समाज बांधव  व ग्रामस्थ उपस्थीत होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post