मक़सूद अली
यवतमाळ : शहरातील गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सराईत आरोपींची धरपकड मोहीम सुरू आहे. यामध्ये नेताजीनगरातून देशी कट्ट्यासह तलवार व अन्य शस्त्र जप्त केले असून, एका युवकाला जेरबंद करण्यात आले. टोळी विरोधी पथकाने गुरुवारी रात्री नेताजीनगरात ही कारवाई केली. वसीम खान दिलावर खान (२६) रा. नेताजीनगर असे अटकेतील युवकाचे नाव आहे. शहरातील गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत आरोपींची धरपकड मोहीम सुरू आहे. २१ फेबु्रवारी रोजी ही मोहीम सुरू असताना वसीम खान हा कोणाचा तरी जीव घेण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्टल घेऊन नेताजीनगरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे टोळी विरोधी पथकाने सापळा रचून २१ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वसीमला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला जिन्स पॅन्डमध्ये खोचून एक देशी बनावटीची पिस्टल, दोन जिवंत काडतूस विनापरवाना बेकायदेशिररीत्या मिळून आले. तसेच त्याच्या घरून धारदार दोन तलवार, चार चाकू असा एकूण ५५ हजार रुपयांचा अवैध शस्त्रसाठा मिळून आला. या प्रकरणी टोळी विरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली टोळी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकूर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, विनोद राठोड, जयंत शेंडे, श्रीधर शिंदे, सतीश सिडाम, राजू कांबळे, आकाश सहारे यांनी केली..
