पूर्णा प्रतिनिधी -{राजेश वालकर}मुस्लिम बांधवांचा औरंगाबाद येथे तिन दिवस संपन्न होत असलेल्या इजतेमासाठी उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने काही विषेश गाड्या सोडण्यात येणार असुन दि. २४,२६ २६ आणि फेब्रुवारी २०१८ रोजी होणाऱ्या कार्यक्रमा करीता दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.(१) गुलबर्गा – औरंगाबाद- गुलबर्गा विशेष गाडी – गाडी संख्या ०१३२१ गुलबर्गा येथून दि. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२.५५ वाजता सुटेल व सोलापूर, लातूर, परभणी मार्गे दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ ला सकाळी ४.०० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०१३२२ हि गाडी औरंगाबाद येथून दि. २६ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ .३० वाजता सुटेल आणि दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता गुलबर्गा येथे पोहोचेल.(२) सी.एस. टी. मुंबई-औरंगाबाद- सी. एस. टी. मुंबई विशेष गाडी –गाडी संख्या ०११८१ सी.एस. टी. मुंबई येथून दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल. पुढे ही गाडी नाशिक, मनमाड, रोटेगाव मार्गे दि.२५ फेब्रुवारी २०१८ ला सकाळी ८.३० वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०११८२ हि गाडी औरंगाबाद येथून दि.२६ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ७.२० वाजता सुटेल आणि दि.२७ फेब्रुवारी २०१८ रोजी पहाटे सकाळी ४.२० वाजता सी.एस. टी. मुंबई येथे पोहोचेल औरंगाबाद येथे ईस्तेमासाठी जाणाऱ्या भाविकानी या विशेष रेल्वे गाडीचा लाभा घ्यावा असे रेल्वे प्रशासना तर्फे कळविण्यात आले आहे.
