इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील भारतमाता मंदिरात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.
यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक अभिमान खराडे, श्रीनिवास माळी, युवा सेनेचे तालुकाप्रमुख दीपक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी कॉग्रसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे, परीट धोबी संघटनेचे तालुकाध्यक्ष अंकुश परीट, भाजपचे शहरध्यक्ष अशोक तिगाडे, मनोज लोखंडे, पिंटू लोखंडे, किशोर जगताप, शंकर जाधव, बालाजी शिंदे, मल्लिनाथ बिराजदार आदी उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त परीट धोबी संघटनेच्या वतीने शहरातील अंगणवाडीतील विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी नारायण लोखंडे, अंकुश परीट, मनोज लोखंडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रा.डॉ. एस.व्ही. सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.एम एल. सोमवंशी, प्रा.डी. एन. कोटरंगे, प्रा.आर. एस. धप्पाधुळे, प्रा. डॉ.पी. व्ही. माने, प्रा.डॉ. सी.जी. कडेकर,प्रा.व्ही.डी.आचार्य, डॉ. शिरीष देशमुख, प्रवीण पाटील,प्रकाश राठोड,संजय फुगटे याच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
