अतुल नवघरे
लाखपुरी : २४ ,मुर्तिजापुर तालुक्यातील गौलखेडी या गावात विविध समस्या आहेत. पण आजवर कोणीही यांच्याकडे लक्ष दिले नाही. आजपर्यंत झालेले सरपंच आणि सदस्यांनी स्वताचे पोट भरण्यापलीकडे कोणतेही काम केले नाही. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून एक स्मशानभूमीही येथील राजकारण्यांना बांदता आली नाही. गावात रस्ते, पथदिवे,नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी, परिसरातील गावांना जोडणारे रस्ते आदी अनेक समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत. ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना अंतर्गत प्राप्त निधीमधून गावात सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्याकरिता सिमेंट नाल्याची निर्मिती करण्यात आली. मात्र या नाल्याची नेहमी साफसफाई केली जात नाही. त्यामुळे नाल्या कचरा व घाणीने तुंबलेल्या असल्याने सांडपाणी नाल्यामधून वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहते.घराच्या परिसरात तसेच वस्त्यातील नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वस्तीतील सांडपाणी वाहणाऱ्या मोरयाची साफसफाई करवून घेणे ग्रामपंचायतीची जबाबदारी असते.
संबधित पदाधिकारी दुर्लक्ष करतात. परिणामी नागरिकांना मानसिक,आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. आपले सरकार या Portal वर तक्रार निवारण प्रणालीवर तक्रार केली होती. एक महिन्यानंतर मसेज आलाStatus: Resolved कोणी पदाधिकारी गावात आला नाही, चौकशी केली नाही. अशी थटटा करण्यात आली. आपले सरकार या Portal वर तक्रार निवारण प्रणालीवरीलToken ID: Dist/ZPAK/2017/346 Date: 28/12/2017 दिले आहे. यावर शासन काय करते याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.ग्रामस्थानच्या वतीने असे सागण्यात आले की जर गौलखेडी या गावातील समस्या सोडविण्यात नाही आल्यातर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.गौलखेडी गावात विविध समस्या असुन या कडे कोणीही लक्ष देण्यास तायर नाही कृपया करुन गावातील समस्या सोडवाव्या अन्यथा लाईलाजसव ग्रामस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.कुणाल राठोड ( ग्रामस्थ गौलखेडी )

