रस्त्यावरील अतिक्रमण काढून शेत रस्ता मोकळा करून देण्याचे मागणी साठी आमरण उपोषणास प्रारंभ



 मूर्तीजापुर ( तालुका प्रतिनिधी) येथुन जवळच येत असलेल्या तालुक्यातील मौजे माना येथील गावात जुना प्लाँँट मधून गेलेला पांढरी रस्ता ( शेतरस्ता) पुर्णपणे अतिक्रमणामुळे ब्लॉक झाला असुन त्या संदर्भात ग्राम पंचायत कार्यालय येथे अनेकदा निवेदन व अर्ज सादर केले. त्या निवेदनाच्या प्रतिलिपी संबंधित अधिकारी याना ही देण्यात आल्या. मात्र त्या वर आजवर काहीच कार्यवाही न झाल्याने नाईलाजास्तव( अन्नत्याग) आमरण उपोषणाला बसावे लागले.मूर्तीजापुर तालुक्यातील मौजे माना येथे गावातीलच ज्ञानेश्वर तुळशीराम कोकणे यांनी दि.२५ फेब्रुवारी पासुन आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. माना गावात जूण्या पलाट मधील रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित काढून रस्ता मोकळा करून देण्यात यावा तसेच हटविलेल्या अतिक्रमण धारकाचे जामठी बु।। फाटयावर शासकीय ' ई ' कलाँँस खुल्या जागेत पुर्णवसन करणे, रेल्वे गेट ते जुन्या पलाँटा मधून ईमरजंसी अँबुलंस साठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अश्या मागणी साठी ज्ञानेश्वर कोकणे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला त्याच्या सोबत संजय किर्दक, बाळासाहेब ढोके, शामजी नागपुरे, घनश्याम आषटीकर ,प्रकाश काळे, प्रकाश मेहरे, गोंविद कोकणे यांनी सुदधा त्यांना आपले सर्मथन दिले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने याना दिली आहे.मागणीची पूर्तता  होईपर्यंत माझे आमरण उपोषण सुरूच रा  हील असे ही ज्ञानेश्वर कोकणे यांनी माहिती देतांना सांगितले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post