मूर्तिजापूर,ता.२७ : खासदार संजय धोत्रे यांचा वाढदिवस भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिका-यांनी आगळ्या पद्धतीने साजरा करत आज आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला. खासदार धोत्रे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या वाढदिवासाचे निमित्य साधून अनाठाई खर्च करू नका असा प्रेमळ दम पक्ष कार्यकर्त्यांना भरला होता. भाऊंचा वाढदिवस तर थाटात साजरा व्हावा, मात्र भाऊ चिडायलाही नकोत, यासाठी काय करता येईल या विचाराने पछाडलेल्या या तालुक्यातील काही पक्ष पदाधिका-यांना नामी युक्ती सूचली. त्यांनी ती लगेच आंमलात आणली आणि 'भाऊं'कडून कौतूकाची थापही मिळविली. सध्या अकोला जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात विपरीत घडते आहे. त्याची दखल माध्यमांसह खूद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मधून घेतली आहे. अशा 'मोर्णा नदी स्वच्छ' करण्याच्या अभियानाला आर्थिक सहकार्य म्हणून ११००० रुपयांचा धनादेश देण्याचे निश्चित झाले. भाजपा तालुकाध्यक्ष नारायण भटकर, कृउबास संचालक डॉ. अमीत कावरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रावसाहेब कांबे, सर्कल प्रमुख सुभाष राऊत,शछत्रपती साबळे, विनायकराव खंडारे यांनी भाजपा मूर्तिजापूर(ग्रामीण) च्या वतीने मोर्णा नदी स्वच्छता अभियानासाठी खासदार संजय धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्य जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ११००० रुपयांचा धनादेश प्रदान केला. या अभियानाच्या यशस्वीतेत मोलाचा वाटा उचलणारे उप विभागीय आधिकारी प्रा. संजय खडसे यांनी हा धनादेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या वतीने स्विकारला.
मूर्तिजापूर भाजपा(ग्रामीण)च्या वतीने खा. धोत्रे यांच्या वाढदिवसानिमीत्य मोर्णा स्वच्छता अभियानास भरीव मदत