![]() |
प्रकाश श्रीवास
मूर्तीजापुर :- येथील दिवंगत रामदास भैय्या दुबे नगर परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मालीनी रमेश विजयकर याचां नुकताच नगर परिषदेच्या सभागृहात जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . नगर परिषदेचे शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यमाचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा सौ.मोनाली कमलाकर गावंडे हया होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्षा आलिया तबबसुम नासीरोददीन,शिक्षण सभापती सुनील महादेवराव पवर, स्थायी समीती सदस्य तथा माजी नगराध्यक्ष दारकाप्रसाद दुबे शिक्षण समीती सदस्या नाकटमँडम, सुनिता संजय गुलहाने , प्रतिक्षा वसुकार, नियोजन समीती सदस्या सरीता पाटील याची उपस्थितीती होती. प्रास्तावीक प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे यांनी करून शाळेच्या प्रगतीची माहिती दिली त्या नंतर पुरस्कार जाहीर करण्यात येवुन जिवन गौरव पुरस्कार मालीनी रमेश विजयकर यांना नगराध्यक्षा मोनाली गावंडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. नगर परिषदेच्या संपूर्ण शाळची प्रगती आता वाढीस लागली असुन सर्व शाळेमधुन चांगले शिक्षण दिले जात आहे. सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती शिक्षण सभापती सुनील पवार यांनी आपल्या भाषणात मधून सांगितले आहे.
