![]() |
मकसूद अली
प्रतिनिधी यवतमाळ :- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज देशाचे बजेट लोकसभेत सादर केले. यामध्ये लागवड खर्च अधिक 50 टक्के नफ्यावर आधारीत हमीभाव देण्याचा निर्णय घोषीत करण्यात आला. हा निर्णय शेतक-यांसाठी एैतिहासिक असल्याची प्रतिक्रिया स्वर्गीय वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. या निर्णयाचा प्रामुख्याने कापूस, सोयाबिन, तुर उत्पादन घेणा-या शेतक-यांना अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परीस्थिती सुधारण्यास मदत होईल विशेष म्हणजे शेतकरी मिशन ने यापुर्वीच लागवड खर्च अधिक पन्नास टक्के नफा यावर आधारीत हमीभाव देण्याची आठवण सरकारला सातत्याने करुन दिली होती. जेटली यांनी 11 लाख कोटी रुपयांचे पीक कर्ज देणार असल्याचे घोषीत केले आहे. यातील मोठी रक्कम महाराष्ट्रात येणार असल्याने राज्यातील डबघाईस आलेल्या शेतक-यांना त्याचा चांगला फायदा होणार असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. ग्रामीन विकासासाठी या बजेट मध्ये 14.34 लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीन भागाचा विकास व्हायला मदत होणार आहे. जगातील सर्वात मोठी आरोग्यावर आधारीत स्कीम सुध्दा घोषीत करण्यात आली आहे. यामुळे गरीब, शेतकरी, मध्यम वर्गीय नागरीकांना 5 लाख रुपयापर्यन्त चा उपचार मोफत मिळणार आहे. याचा देशातील जवळपास 50 कोटी नागरीकांना फायदा होणार आहे. तीन जिल्हयामागे एक मेडीकल कॉलेज, दिड लाख आरोग्य केन्द्र यामुळे आरोग्य सुविधेचा प्रत्तेकाला लाभ मिळेल असा विश्वासही तिवारी यांनी व्यक्त केला. शेतीशी संबधित व्यवसायाला तेजी आनण्यासाठी सुध्दा भरघोस आर्थीक तरतूद करण्यात आली आहे. यामुळे क्लस्टर बनवून शेतकरी सुध्दा व्यवसायामध्ये उतरु शकतो असा विश्वास सुध्दा तिवारी यांनी व्यक्त केला आहे.
![]() |

