मूर्तिजापूर तालुक्यात विविध ठिकाणी मातृ-पितृ पूजन


प्रकाश  श्रीवास 
मूर्तिजापूर  :-  येथील योग वेदांत समिती व अन्य सहयोगी सेवाभावी संस्थांच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.फेब्रुवारी महिन्यात सर्वत्र वेलेंटाइन डे साजरा करण्याची प्रथा प्रचलीत आहे. तो प्रघात बाजुला ठेऊन येथील अन्नपूर्णा माता मंदिर, महादेव मंदीर, विठ्ठल मंदीर, अष्टविनायक कॉन्व्हेंट, सिरसोचे विठ्ठल मंदिर, स्वामी विवेकानंद विद्यालय, जि.प. हायस्कूल, काकाणी कॉन्व्हेंट, मालाणी कॉन्व्हेंट, बचपन प्ले स्कूल, ज्युबिली इंग्लीश स्कूल, व्यंकटेश बालाजी कॉन्व्हेंट, कांबै किड्स कॉन्व्हेंट, मूर्तिजापूर हायस्कूल, गजानन मंदीर, नरहरी  सोनार समाज मंदिर, लक्ष्मी लीला भवन, हिरपूरचे सनातन मंदीर, शेरवाडी चे गाजानन मंदीर आदी ठिकाणी आयोजित मातृ-पित्रू पूजन सोहळ्यात असंख्य पालक सहभागी झाले. मातृ-पितृ पूजनानंतर त्यांनी आपल्या पल्यांना शुभिशीर्वाद दिले व अशा कार्यक्रमांचे वारंवार आयोजन व्हावे, अशी अपेक्षा भावूक होत व्यक्त केलीलि. योग वेदांत समितीचे गोपाळ, कावरे, प्रमोद ढाकरे, सुदेश महाजन, हितेश धंधुकिया, चन्दन अग्रवाल, सुनील गडवे, मालवे गुरूजी, अनिल शर्मा, सुनील पंचबुद्ध, मुन्ना नाइकनवरे, सौ राजपाल, श्री कावरे, सरूव शाळांचे मुख्याद्यापक, शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचा-यांनी आयोजनात पुढाकार घेतला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post