![]() |
मकसूद अली
यवतमाळ :- सरकारच्या महागाई धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळ च्या वतीने मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. हातगाडी वर दुचाकी व सिलेंडर ठेऊन त्याला भाजीपाल्याचे हार घालण्यात आले मोर्चातील कार्यकर्त्यांनी दुचाकी व सायकली हातात घेऊन ढकलत स्थानिक नेताजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.मनसेच्या वतीने निघालेल्या मोर्चात सरकार विरोधी प्रचंड घोषणा देण्यात आल्या.सरकारने सामान्य जनतेचे महागाईने कंबरडे मोडले असून सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.मोर्चात सायकली व गाड्या ढकलून या सरकारने आम्हाला सायकल गाडी चालवायची सोय ठेवली नसून पेट्रोल डिझेल गॅस भाजीपाला च्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
![]() |

