![]() |
- युवासेना अकोला च्या_वतीने पाश्चिमात्य संस्कृतीतील व्हॅलेंटाईन डे चा अनोखा निषेध....
अकोला :- युवासेना अकोला च्या_वतीने पाश्चिमात्य संस्कृतीतील व्हॅलेंटाईन डे चा अनोखा निषेध म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना अकोला चे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनीं तरुण तरुणींना मार्गदर्शन केले.ते बोलतांना म्हणाले की तरुण वयात युवकांनी स्वताच्या करियर कड़े लक्ष्य देने गरजेचे आहे. चांगला अभ्यास करुण स्व:तच आयुष्य घडवायच आहे. आपण भारतीय नागरिक परंतु आपल्या तरुण तरुणींना देशाची खरी संस्कृती काय आहे हे माहिती सुद्धा नाही.कारण त्यांना पाश्चिमात्य संस्कृतीच वेड लागलं आहे.त्यातीलच एक प्रकार म्हणजे १४ फेब्रुवारी ला व्हेलटाईन डे या पाश्चिमात्य संस्कृतीचा सण आपले तरुण तरुणी प्रेमदिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करत आपला अमूल्य वेळ वाया घालवत आपल्या करिअर कडे दुर्लक्ष करत असतात, मात्र अशी संस्कृती जपण्यापेक्षा आपली विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती जपली जावी.या दिवशी तरुण तरुणींना जीवनात ज्या गोष्टीची खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे अभ्यासाची ज्यामुळं आपलं जीवन बदलू शकते.यासाठी युवासेना अकोला च्या वतीने १४ फेब्रुवारी या दिवशी व्हॅलेन्टाईन डे या दिवसचा निषेध नोंदवीण्यासाठी अनोख्या जनहिताच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रामुख्याने प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री.विजयकांत सागरसाहेब (अकोला जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक) यांचे तरुण तरुणींच्या भविष्यासाठी योग्य ते मोलाचे मार्गदर्शनपर व्याख्यान केले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष्य म्हणून सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर उपस्थिती शहरप्रमुख राजेश मिश्रा,तरुण बगेरे प्रा.नलकांडे सर,प्रा.अनुज सर,प्रा.पागृत सर,प्रा.कुटे सर, प्रा.पारखे सर यांचे मार्गदर्शन झाले.
![]() |

