बुथवरच्या लढाईसाठी शिवसेनेची मोर्चे बांधणी



प्रवीण वैष्णव
     आढावा बैठकीमध्ये तालुका प्रमुखांचे निर्देश
तेल्हारा :- आगामी सर्व निवडणुका यशस्वीपणे लढण्यासाठी समस्त शिवसैनिकांनी बुथवरची लढाई लढण्यासाठी आता पासून कामाला लागा असे निर्देश तालुका शिवसेना प्रमुख विजय मोहोड यांनी २८ जानेवारीला तेल्हारा येथील आढावा बैठकीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर झाल्याने तेल्हारा तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने आढावा बैठके घेण्यात आली. या बैठकीमध्ये गाव तेथे शाखा, शाखा तेथे युवसेना, महिला आघाडी आदी बाबत पक्ष बांधणी तसेच शहरात व तालुक्यात येत असलेल्या सर्व बुथवर एक बूथ प्रमुख व त्यांच्या सोबतीला दहा झानांची टीम यामेध्ये ज्येष्ठ नागरिक, युवक व महिलांचा सहभाग राहणार आहे. यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असून समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेवून प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी बुथवरची जीतयारी असायला हवी ती तयारी आतापासून करायला सुरुवात करा. बुथवरची लढाई जिंकली कि निवडणुका हमखास जिंकू असे मार्गदर्शन शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड यांनी केले.सदर बैठकीचे प्रास्ताविक रामभाऊ फाटकर तर सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव यांनी केले. आढावा बैठकीला उपतालुका प्रमुख संजय अढाऊ, पुरुषोत्तम गावंडे, शिव कुकडे, विठ्ठलराव जोशी, विक्रम खोटरे, पिंटू फोकमारे, शहर प्रमुख विक्रांत शिंदे, निलेश धनभर, गणेश तीव्हाने, जयंतराव गावंडे, गजानन मोरखडे, सचिन थाटे, विवेक खारोडे, हेमंत अवचार, रमेश धामोडे, गजानन सोनटक्के, जयवंत चिकटे, बंटी राउत, राहुल झापर्डे, शुभम सोनटक्के, मयूर सुगंधी, संदीप आवारे, गणेश काळे, रहेमान शहा, ज्ञानेश्वर बोर्डे, अमर ठाकूर, अरुण मिरगे, नितीन आखरे, रोषण वडतकार, आशिष शेळके, राहुल पुदाखे, गोपाल लोखंडे, प्रमोद कापसे, आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post