ग्रामपंचायत दुर्गवाडा येथील उपसरपंच श्री. योगेश मुरलीधर प्रांजळे पायउतार....

अतुल नवघरे
लाखपुरी:३१ , मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी सर्कल मधील ग्रा.पं. दुर्गवाडा ता. मुर्तिजापुर जि. अकोला येथील उपसरपंच श्री. योगेश प्रांजळे यांच्या वर दि. २३ /०१/२०१८ रोजी मा. अध्यक्षी अधिकारी तथा तहसिलदार श्री. राहुल तायडे यांचे अध्यक्षतेखाली ग्रा.प.कार्यालय दुर्गवाडा येथे दुपारी ३ वाजता . श्री.संतोष रामरावजी गवई ,सतिष मनोहरराव पंडीत ,सौ. मायाताई किशोर नवघरे , सौ. सुरेखा संतोष गवई यांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर सविस्तर चर्चा करण्यात आली . ह्या मध्ये अविश्वास ठराव ६ पैका ४ मतांनी पारीत झाला असुन २ सदस्य गैरहजर राहिल्यामुळे ठरावा विरुध्द शुन्य मतदान  झाले. ह्या ग्रामपंचायतीमध्ये  एकुण ७ सदस्य असल्यामुळे ह्या अगोदर मा. विभागीय आयुक्त अमरावती यांनी सरपंच सौ. रंजनी अशोक फाटे ह्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९(१) नुसार सरपंच व सदस्य या पदासाठी  दि. २४-११-२०१७ रोजी अपात्र घोषीत केले आहे. उपसरपंच  यांचे विरुध्द अविश्वास ठराव पारीत झाल्यामुळे वि.तहसिलदार यांनी सर्वानुमते मंजुर झाल्यांचे घोषीत केले. ह्या मिटींग करिता ग्रामसेवक सुनिल अवधुत , तलाठी श्री. ठोसर , व्हि. एस पुंड साहेब इत्यादी उपस्थीत होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post