बोरगावमंजू येथील महिला पत्रकाराला बेदम मारहाण .


शंकर जोगी 

  •  बोरगावमंजू येथील महिला पत्रकाराला बेदम मारहाण

  • दाळंबीच्या सरपंचासह तिघांनी केली मारहाण 

  • बोरगावमंजू पोलिसांची भूमिका संशयास्पद


बोरगावमंजू :-  बोरगावमंजू येथील महिला पत्रकार सौ. छाया दादाराव सनिसे यांनी वर्तमानपत्रातून दाळंबीच्या सरपंचाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याने संतापलेल्या सरपंचा आणि त्यांच्या सहकाNयांनी मंगळवार २३ जानेवारी रोजी सदर महिला पत्रकाराच्या घरात घुसून त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत फाशी देऊन ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सौ. सनिसे यांनी बोरगावमंजू पोलिसांत सरपंचा आणि इतरांच्या विरोधात तक्रार दाखल केली; मात्र सनिसे यांच्या कपाळावर जखम होऊन आणि रक्तस्त्राव होऊनही पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल न करता प्रकरण चौकशीत ठेवल्याने बोरगावमंजू पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. बोरगावमंजू येथील महिला पत्रकार सौ. छाया दादाराव सनिसे यांनी दाळंबीच्या सरपंचाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बातम्या प्रकाशित केल्याने संतापलेल्या सरपंचा आणि इतरांनी महिला पत्रकाराला मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. महिला पत्रकार सौ. सनिसे या घरात एकट्या असल्याची संधी साधून आकाश रमेश मांडोकार यांनी सनिसे यांचा हात पकडून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा विनयभंग केला. त्यामुळे घाबरलेल्या सौ. सनिसे यांनी आरडाओरडा केल्याने आकाश तेथून पळून गेले त्यानंतर दाळंबीच्या सरपंचा बयाबाई देवराव मांडोकार, रमेश देवराव मांडोकार आणि देवराव मांडोकार, सर्व राहणार दाळंबी यांनी सनिसे यांच्या घरात घुसून त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, त्यांच्या डोक्यात पाईपने मारुन कपाळावर जखम केली तसेच अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकीही दिली. यावरुन सौ. सनिसे यांनी बोरगावमंजू पोलिस स्टेशनला जावून या चारही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. परंतु बोरगावमंजू पोलिसांनी सनिसे यांची तक्रार जशीच्या तशी दाखल करुन घेतली नाही, तर त्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या मर्जीने पेâरबदल केले आणि या गंभीर तक्रारीला सौम्य स्वरुप देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सौ. सनिसे यांनी यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केला असून, बोरगावमंजू पोलिसांना या प्रकरणात योग्य ती कारवाई करुन, आकाशवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. सौ. सनिसे यांच्या कपाळावर जखम झाली असून, रक्तस्त्रावही झाला असताना पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ३२४ चा गुन्हा दाखल न करता ३२३, ५०४, ५०६ असे सौम्य स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन प्रकरण अदखलपात्र केल्याने बोरगावमंजू पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.       

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post