कुंभार समाजाची बैठक संपन्न

राजेश वालकर
पूर्णा प्रतिनिधी - शहरातील कुंभार गल्ली परिसरामध्ये शहरातील कुंभार बांधवांची बैठक घेण्यात आली, या बैठकीला कुंभार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय गाते उपस्थित होते, यावेळी    रामेश्वर सोळंके,युवकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पल्ले, यांनी उपस्थितांचे शॉल श्रीफळ देऊन स्वागत केले. तर आपल्या मुख्य मार्गदर्शनात संजय गाते यांनी ग्रामीण भागात सर्वांच्या हाकेला धावून जाणाऱ्या कुंभार समाजाचे विविध प्रश्न व मागण्या प्रलंबित असून ,या मान्य करून घेण्यासाठी 5 मार्च रोजी मुंबई विधान भवणावर समाज बांधवांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली ,या मोरच्याला जिल्ह्यातून दहा हजार समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रविकुमार पर्डे ,बाळू पिंपरने,राजू पर्डे,विलास हिवरकर,नागनाथ लिंगायत,सह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post