पैगंबरांनी मानसा सोबतच् व्यवस्थेत पारिवर्तन घडविले - नौशाद उस्मान



ताहेर मिर्ज़ा 
प्रतिनिधी उमरखेड : - आपण एकाच मातापित्याची लेकरे, सर्वांचा निर्मिक एक, मृत्युनंतर केल्या सवरल्याचा जाब देण्याची भावना या तत्वामुळे मानुस सुधरू शकतो, व्यवस्था सुधरू शकत नाही .  सामाजिक परिवर्तन करुन वरील चार तत्वावर आधारीत व्यवस्था उभारणी मुहम्मद सल्लम यांनी केली, असे उद्गार नौशाद उस्मान यांनी काढले , ते जमाते इस्लामी हिंद तर्फ नगर परिषद मंगल कार्यालयात जाहीर सभेत बोलत होते .या प्रसंगी मंचावर एजाज असलम, मो .मोहसीन , अ . हकीम शेख,नामदेव ससाने, नितीनभुतडा, दिलीप सुरते, इनामतउल्ला जनाब, डीबी अंभुरे, सै इरफान, अख्तरखान, आनंद देशमुख, जमीर खतीब, शेवंतराव गायकवाड, अ.रउफ, उन्हाळे, अशोक गांजेगावकर, अजहर खान, डॉ .आंबेजोगाईकर आदी मान्यवर उपस्थित होते .नौशाद उस्मान पुढे म्हणाले की , ' पैंगबरांच्या व्यवस्था परिवर्तनानंतरच्या दहा वर्षात फक्त नऊ अपराधांची नोंद मिळते . एक सुंदर स्त्रि आपल्या हाताने सोनं हवेत उडवत सना प्रांतापासून मृत सागरा पर्यत म्हणजे कशमीर ते कन्याकुमारीपर्यंत जाईल आणि तीला कसलीच भिती राहणार नाही . हे मुहम्मद सल्लमचे कथन त्यांचे दहा वर्षाचे व्यवस्थेत पूर्ण झाले .नौशाद पुढे म्हणाले की, हीच व्यवस्था जमाते इस्लामी हिंद भारतात कायम करू इच्छिते . येथे कोणी आत्महत्या करू नये, सर्वाना न्याय मिळावा समता प्रस्थापित व्हावी, पुढे ते म्हणाले की वेश्यामुक्त भारत  निर्माण करण्याचे संघटनेचा उद्देश असल्याचे सांगत हे काम  जमाते इस्लामी हिंद एकटी करू शकत नाही . या कार्यात आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले .मुहम्मद पैगंबर हे इस्लामचे संस्थापक नाहीत तर  शेवटचे  प्रेषित असल्याचे सांगत इस्लामचा उदय चौदाशे वर्षापुर्वीचा नसून मानवनिर्मितीपासूनचा असल्याचे नौशाद यांनी स्पष्ट केले .शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम हा एकत्व -सर्वाचा निार्मिक एक, अखेरत्व- मृत्युनंतर अल्लाह सर्वांना एकदाच जीवंत करून केल्या सवरल्याला चा जाब विचारणार आहे याचे भान , प्रेषित्वर्‍ पहिले प्रेषित आदम यांचे पासून तर अंतिम प्रेषित मुहम्मद सललमपर्यंत जवळपास १ लाख२४ हजार प्रेषितांशी इमान राखने आणि अंतिम प्रेषितांना प्रमाण मानने तसेच व्यवस्था परिवर्तन -सामाजीक परिवर्तन करून आधीच्या चार तत्वावर आधारीत व्यवस्था उभारणी करणे हे पांच सिद्धांत सांगतो अशीही माहीती नौशाद उस्मान यांनी दिली .कार्यक्रमाची सुरवात कारी अली यांचे कुरआन पठणाने झाली . सुत्रसंचलन प्रा . फारूक खान यांनी तर आभार प्रर्दशन स्थानिक अध्यक्ष अ .रउफ यांनी केले  .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post