![]() |
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश अंधारे यांनी केले. यावेळी मतदार जन जागृतीसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव प्रमाणपत्र देवून करण्यात आला. यात चित्रकला स्पर्धेत प्रथम निकीता राऊत, व्दितीय प्रांजली भोजेकर, तृतीय श्वेता काटोलकर यांचा, वादविवाद स्पर्धेत प्रभात किडसचा समिक्षाराजे खुमकर व सानिका जुमडे यांच्या तर व्दितीय डॉ.हेगडेवार विद्यालय व तृतीय भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. निबंध स्पर्धेत प्रथम प्राजक्ता देशमुख, व्दितीय तेजस्विनी वासतकर, तृतीय शुभम दामोधर यांचा गौरव करण्यात आला. रांगोळी स्पर्धेत विद्या घाटोळ, उमा गावंडे, प्रिती शिंदे यांचा गौरव करण्यात आला.सामान्य ज्ञान स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे वेदांत देशमुख व पवन बावने, आगर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मतदार जागृती रॅलीत दिव्यांगानी भाग घेतला त्यापैकी प्रतिनिधीक स्वरुपात संजय बरडे, श्रीकांत देशमुख या दिव्यांगाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला. अन्वी मिर्झापूर येथील अक्षय गावंडे, अकोल्याचे प्रशांत वानखडे, चिखलगावचे अमोल गावंडे या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
यावर्षी वयाचे 18 वर्ष पुर्ण झालेल्या सहस्त्रक नव मतदार अल्फीया फरदीन खान, तफझुल हुसेन खान, अर्शद अलीम खान, विश्वमित्र चित्ते, स्वागत इंगळे, स्नेहा त्रिपाठी, तुषार तायडे, सौरभ पागृत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काही मतदारांना मतदान ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पश्चिम व पुर्व मतदार संघात उत्कृष्ट काम करणा-या बि.एल.ओ. चा सत्कार करण्यात आला. वादविवाद स्पर्धेत गौरविण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी समिक्षा खुमकर व सानिका जुमडे यांनी आपले विचार व्यक्त केले. एकुण 13 तास एकाग्रतेने मेहनत घेवून सुबक रांगोळी काढणा-या सौ. मोनिका अमित अनासने यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय दिनानिमित्त शपथ घेतली. या कार्यक्रमाला विविध विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, मतदार, गुणवंत विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.
