मातोश्री त्रिवेणी बोंडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सर्वधर्मीय संत मेळावा संपन्न .



  • आई म्हणजे परमेश्वराचं
  • चालत – बोलत रूप – जितेंद्रनाथ महाराज


वरुड (अमरावती) : आई म्हणजे परमेश्वराचं  चालत – बोलत रूप आहे. आई म्हणजे विचारांचे धन आहे. सन्मार्गाचे आचरण करण्याचे संस्कार आई देत असते असे उदगार नाथपीठाचे परमपूज्य पं.श्री.जितेंद्रनाथ महाराज यांनी काढले. आज बुधवार 24 जानेवारी 2018 रोजी वरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या मातोश्री त्रिवेणीताई सुखदेवराव बोंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय संत मेळाव्यात उपस्थित मोर्शी-वरुड मतदार संघातील नागरिकांना प्रबोधन करतांना ते बोलत होते.
यावेळी ह.भ.प.कन्हेरकर महाराज, योगीराज महाराज, मौलाना महमद वली उल्लाह, पास्टर वसंतजी दंडाले, सुरेश महाराज, दिलीपसिंग ग्रंथी साहब, योग प्रशिक्षक गिरीधर देशमुख, आर्ट ऑफ लिविंगचे अशोक नानोटकर, उत्तरप्रदेशचे भंते संघप्रिय सरस्वती, मोझरीचे ग्रामगीताचार्य श्री रायजीप्रभू शेलोटकर, मोर्शीचे गुरुदेव प्रचारक केशवरावजी भोंडे, राऊत गुरुजी, श्री.सुखदेवराव बोंडे, रामदासजी बोंडे, माजी खासदार अनंतराव गुढे, आमदार डॉ.अनिल बोंडे, डॉ.वसुधा बोंडे, सुनील बोंडे, मीनल बोंडे, माधुरी बोंडे (मेटांगे), संगीता बोंडे (शिंदे), डॉ.कुणाल बोंडे, मनाली बोंडे तसेच न.प.वरुडच्या नगराध्यक्षा स्वाती यु.आंडे, उपाध्यक्ष हरीश कानुगो, न.प.मोर्शीच्या नगराध्यक्षा शीला रोडे, उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, जि.प.अमरावतीच्या माजी सभापती अर्चना बाळूभाऊ मुरुमकर, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अंजली तुमराम, मुरलीधर फुसे, शेघाटचे माजी नगराध्यक्ष सुरेंद्र आंडे, जि.प.माजी सदस्य गोपाल मालपे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित होते.सर्वधर्मीय संत मेळाव्याच्या प्रारंभीच मातोश्री त्रिवेणीताई बोंडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदराजंली वाहण्यात आली. त्यानंतर मातोश्रीच्या जीवनावर प्रकाश टाकत सुनील बोंडे यांनी प्रास्ताविकातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितीत संतमहंतांनी आईच्या प्रथमपुण्यस्मरण दिनी विचारव्यक्त केले. यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते किसान कार्डाचे विमोचन करून शेतकरी बांधवांना वितरीत करण्यात आले. तसेच मोर्शीचे गुरुदेव प्रचारक व शिक्षण विस्तार अधिकारी दिंगबर निचित यांनी त्रिवेणीताई बोंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मातोश्रीच्या जीवनचरित्रावर गीत सादर केले. त्याबरोबर नाथपीठाचे परमपूज्य पं.श्री.जितेंद्रनाथ महाराज यांचे प्रबोधन व सर्वधर्मीय संत मेळाव्याच्या समारोपीयप्रसंगी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन श्रद्धाजंली अर्पण केली. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनेने मेळाव्याची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार राऊत तर आभार प्रदर्शन डॉ.वसुधा बोंडे यांनी केले .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post