तेल्हारा दि .आगामी सर्व निवळणुकांच्या अनुषंगाने तेल्हारा तालुका व शहर शिवसेना पदाधिकारी यांची महत्व पूर्ण आढावा बैठक 28 जानेवारी रविवारी दुपारी 2 वाजता स्थानिक विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर सर्व निवळणुकां लढण्याचे जाहीर केल्याने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी तालुक्यातील उपतालुका प्रमुख जिल्हा परिषद ,पंचायत समिती सर्कल प्रमुख सर्व शाखा प्रमुख शहरातील पदाधिकारी यांची आढावा बैठक तालुका प्रमुख विजय मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक विश्रामगृह येथे 28 जानेवारी दु ,2 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी शवसेनेच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे प्रसिध्दी प्रमुख प्रवीण वैष्णव यांनी पत्रकाद्वारे कळविले .