तेल्हारा शहरामध्ये मुत्री घरांच्या अभावामुळे नागरिकांनी महापुरुषांच्या स्मर्कालाच बनविले मुत्रीघर स्वच्छ भारत मिशनच्या नावावर तेल्हारा न प ची लाखोंची लुट



प्रवीण वैष्णव
तेल्हारा : -  स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली तेल्हारा नगर परिषद लाखो रुपयांचा निधी पाण्यासारखा वाया घालत आहे. जाहिराती, फ्लेक्स, बॅनर, वाहने असे कित्येक प्रकारच्या मोहीम राबवत आहे आहे. मात्र शहरातील नागरिकांना लघुशंकेसाठी मुत्रीघारेच नसल्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा तेल्हारा शहरामध्ये फज्जा होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान न प तेल्हाराच्या वतीने राबविण्यात येत आहे. मात्र शहरामध्ये महत्वाच्या चौकांमध्ये एकही मुत्रीघर नसल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील येणाऱ्या नागरिकांनी चक्क महामानवांच्या स्मारक, शाळा, नगर परिषद परिसराला मुत्रीघर बनविल्याचे दिसून येत आहे. झोपी गेलेले न प प्रशासन व लोक प्रतिनिधी लक्ष घालतील का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post