विलास नसले
मुर्तिजापूर प्रतिनीधी - आरोग्य सेवेबाबत जनजागुती आणि प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी जागुत राहणे अत्यंत महत्वाचे आहे. आरोग्याच्या प्रती गाफिल राहून चालणार नाही.आपल्या आरोग्यासाठी घातक असलेल्या अथवा आरोग्यावर दिर्घकाळ परीणाम करणा-या बाबींच्या बाबतीत आपण सर्तक राहणे ही गरजेचे आहे. प्लास्टिकचा अति वापर घातक असून काॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला निमंत्रण देणार ठरतो. असे प्रसिध्द कॅन्सर तज्ञ डाॅ. प्रसाद सोर यांनी सांगितले. ते श्री गाडगे महाराज महाविद्यालयाच्या राश्ट्रीय सेवा योजना तर्फे व महात्मा फुले जनआरोग्य योजना अकोला जिल्हा महाराश्ट्र शासन यांच्या वतीने रा.से.यो. दत्तकग्राम हातगाव येथे आयोजित रोगनिदान शिबिरात मार्गदर्शन करतांना बोलत होते. आरोग्य शिबीरामध्ये नेत्ररोग तज्ञ डाॅ. शुभांगी बोराखडे यांनी गावक-यांना चश्मे वाटप केले. या शिबीराकरीता जिल्हा समन्वयक सुनिल वाठोरे, सिटी व ओझोन हाॅस्पीटलचे तज्ञ डाॅ. जगदीष जोषी, डाॅ. दिपक पांडव, डाॅ. विनोद रामटेके, डाॅ. अरूण पाटील, डाॅ. संतोष पाटील, डाॅ. आशिष गि-हे, डाॅ. जगदीष भटकर, डाॅ. तुशार सायवे, तसेच नाना पाटील, नागेष नगरकर, सरिता काळे, श्रध्दा नागलकर, रिना चतरकर, यांनी आरोग्यसेवा दिली. या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रचार्य संतोश ठाकरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मनिशा यादव, प्रा. चव्हाण, तसेच संयमसवेक यांनी परीश्रम घेतले. या शिबिरात प्रा. डाॅ. उपाध्ये व पा्र. मिना भाकरे यांचा सहभाग होता.