मुर्तीजापूर स्वच्छता अभियानाचा दुस-या शनिवारीही होता सहभाग .


सोहेल शैख़ 
मुर्तिजापूर प्रतिनीधी - वैराग्य मुर्ती संत गाडगे बाबांच्या मंगलमय सानिध्यात पावन झालेल्या कर्मभूमीत सतत तीन वश्र्शपासून निस्वार्थपणे आणि प्रसिघ्दीपासून अलिप्त राहत स्वच्छतेचा उपक्रम राबविणारे स्वच्छता अभियानातील सर्वसदस्य सर्वस्व ओतून उपक्रम अवीरतपणे राबवीत आहेत. शहरात त्यांच्या कार्यातुन त्यांनी  आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरातील नाले, नाल्या, सार्वजनीक ठिकाणे उपजिल्हा रूग्णालय, शाळा, पोलीस स्टेशन आठवडी बाजार, महाविद्यालय या सह आणि मुंबई व इतर ठिकाणी अभियान राबवुन संत गाडगे बाबांचा संदेश समाजमनात रूजवीण्याचा प्रयत्न सातत्याने स्वच्छता अभियानातील स्वच्छतादुत करीत आहे. विर्दभातील काॅटन सीटी म्हणून ओळखले जाणारे महत्वाचे शहर राजराजेष्वर यांची पावनभूमी अकोला षहरातील मध्यभागातून वाहणारी मोर्णा नदी दूषित आणि गलिच्छ झाली होती.
या नदीला स्वच्छ करून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी समस्त अकोलेकरांना भावनिक साद घातली त्यांच्या या दिलेल्या साद ला सर्व राजकीय पदाधिकारी पक्ष, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, यांचे सोबतच स्वच्छता अभियान मुर्तिजापूरने स्वतःहून प्रतिसाद देवून मोर्णा स्वच्छ अभियानात सहभाग नोंदवून आपल्या कार्यांने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. अभियानातील सर्व स्वच्छता दुतांनी दुस-या शनीवारी देखील मोर्णा स्वच्छ अभियानात सक्रीय सहभागी होवून आपल्या सामाजीक दायीत्वाचा विसर पडू दिला नाही. या अभियानात मुर्तिजापूर मतदार संघाचे आमदार हरिश पिपंळे यांनी सक्रीयपणे सहभागी होवून आपण देखील सामाजीक कार्यात  मागे नसल्याचे  दाखवून दिले. आमदार पिंपळे यांनी  अग्रक्रमाने सहभागी होवून मुर्तीजपूर  स्वच्छता अभियानाच्या स्वच्छता दुतांचाा उत्साह वाढवीला. आमदार हरिश पिंपळे यांनी  सतत दुस-या शनिवारी या उपक्रमात स्वच्छता अभियाना सोबत सहभागी होवुन राश्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवीला
.
स्वच्छता अभियानाचे प्राचार्य सत्यनारायण तिवारी, विलास नसले, रोहीत सोळंके, विलास वानखडे, दिनेष श्रीवास, सुरेन्द्र भेलोंडे, प्रषांत कांबे, अमोल तातुरकर, माजी सैनिक रविंद्र गावंडे, माजी मुख्याध्यापक ज्ञानेष्वर भड, रावसाहेब अभ्यंकर, रवि चैहान, विठठल काकोडे,कुपा बोरकर, षैलेष संगमवार, विष्णू लोडम, संजय डेंगेकार, नितिन मांडगुळकर,सागर देशमुख, अक्षय वाघपांजर, विपुल येदवर, निलेश हांडे, गोसावी इत्यादीं सदस्यांचा या राश्ट्रीय कार्यत सहभाग आहे. मोर्णा नदीच्या पात्रात उतरून जलकुंभी काढण्याचे काम स्वच्छता अभियान मुतिजापूरच्या स्वच्छता दुतांनी केले. त्यांच्या या कार्याबददल घाटावर खासदार संजय भाउ धोत्रे, आमदार रणधीर सावरकर , आमदार गोर्वधन षर्मा, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी खडसे, मुर्तिजापूरचे तहसीलदार राहूल तायडे, आदी मान्यवारांनी भेटी देवून कार्य पाहून समाधान व्यक्त केले.  मुर्तिजापूर स्वच्छता अभियान दिखावा नव्हे तर आपल्या कार्याच्या माध्यमातुन गाडगे बाबांचा संदेष जनतेपर्यंत गाजावाजा न करता करीत  असल्याचे मान्यवरांनी नमुद केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post