पहील्या व चैथ्या बुधवारी तहसीलमध्ये समस्या निवारण शिबिराचे आयोजन .


मुर्तिजापूर प्रतिनीधी - जिल्हाचे जिल्हाधिकारी यांचे आदेशावरून जनतेच्या समस्या , निवेदने स्विकारणे व समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयात महिन्याच्या पहिल्या व चैथ्या बुधवारी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या दरम्यान सुटी आल्यास लगतच्या दुस-या दिवशी सदर शिबिर आयोजित करून जनतेच्या समस्या, निवेदने,तक्रारी यांची दखल घेवून त्या तिथेच सोडविण्या जाणार आहे. या तालुकास्तरीय षिबिरामध्ये अर्जदाराच्या तक्रारीचे समाधान झााले नाही तर जिल्हास्तरीय जनता दरबारामध्ये त्या दाखल केल्या जातील. याबाबतीत पालकमंत्री यांच्या कडून तालुकास्तरीय शिबिरामध्ये सदर समस्या, निवेदने, तक्रारी दाखल केली का  ? याबाबत प्रथम विचारणा केली जाईल त्यामुळे नागरिकांनी आपल्या तक्रारी प्रथम तालुकास्तरीय विशेष शिबिरामध्ये दाखल कराव्यात असे आवाहन तहसीलदार  तायडे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post