कानडखेड येथे शालेय साहित्याचे वाटप



राजेश वालकर
पूर्णा प्रतिनिधी :- तालुक्यातील कानडखेड येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राप कार्यालयात धोजारोहन सरपंच तुकाराम सालपे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उपसरपंच चिमणाजी बारसे ,ग्रामसेवक शिंदे,मारोती धोत्रे, शिवराम डाढाळे,सत्तार खान पठाण,दौलत पठाण,अली सय्यद,उपस्थित होते. यावेळी शाळेतील विध्यार्थ्यांना वह्या ,पुस्तके, खाऊचे वाटप,सरपंच तुकाराम सालपे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी बोलताना सालपे यांनी प्रजासत्ताक दिन हा सर्वांसाठी महत्त्वाचा असून देशामध्ये स्वातंत्र्य समता व बंधुत्व टिकून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. तर गावामध्ये अनेक लोककल्याणकारी योजना प्रभावी पणे राबून नागरिकांना पिण्याचे स्वछ पाणी आरोग्याच्या सुविधा अंतर्गत पक्के रस्ते दर्जेदार शिक्षण देऊन गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे ते म्हणाले यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाची अनेक गीते सादर केली या कार्यक्रमाला ग्राप सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post